दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

रस्ता ओलांडत असताना मोटारसायकलने वृद्ध महिलेला धडक दिल्याची घटना दहिसर येथे घडली. लीना फर्नांडिस असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी एमएचबी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. लीना या दहिसर येथील कांदरपाडा येथे राहत होत्या. रविवारी त्या पाव आणण्यासाठी बेकरीमध्ये गेल्या होत्या. तेव्हा मोटारसायकलने धडक दिली. त्यात त्या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी मोटारसायकल स्वाराविरोधात गुन्हा नोंद केला.