
मुंबईत पाणी तुंबण्याची ठिकाणे गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली असताना नालेसफाईची कामे जलदगतीने होणे आवश्यक होते. मात्र पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या नालेसफाईचीही रखडपट्टी सुरूच आहे. पावसाळा तोंडावर आला तरी मुंबई महापालिकेने आतापर्यंत 80 टक्क्यांपैकी केवळ 30 टक्के नालेसफाई केली आहे. त्यामुळे या वर्षी मुंबईत अतिवृष्टी झाली तर ठिकठिकाणी पाणी तुंबून मुंबई विस्कळीत होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.