‘महाराष्ट्राचा सीबीएसई पॅटर्न’ या विषयावर चर्चा

आगामी शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीपासून लागू होणाऱ्या सीबीएससी पॅटर्नबाबत 5 एप्रिलला शिक्षण कट्टा या शैक्षणिक विषयांवर कार्यरत असलेल्या व्यासपीठावर चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. सीबीएसई पॅटर्न लागू करण्याबाबत शालेय शिक्षण मंत्र्यांनी नुकतीच विधिमंडळ अधिवेशना दरम्यान घोषणा केली. शिक्षण हा समाजाच्या जिव्हाळ्याचा आणि देशाच्या भवितव्याचा विषय आहे. यासंदर्भात यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचाच्या शिक्षण कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ञांची चर्चा घडवून आणली जाणार आहे. शनिवार 5 एप्रिलला दुपारी 2ः30 ते 5 या वेळेत रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही चर्चा होईल.

यात मार्गदर्शन करण्यासाठी मेरिडियन सीबीएसई स्कूलच्या प्राचार्य भाग्यश्री पिसोळकर, शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अभ्यासक्रम समितीचे सदस्य महेंद्र गणपुले सहभागी होतील. या कार्यक्रमात शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणतज्ञ, अभ्यासक, पत्रकार, पालक, विद्यार्थी यांना सहभागी होऊन आपले विचार मांडता येतील. कार्यक्रम निःशुल्क आहे. मात्र नोंदणी आवश्यक आहे.

ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी पुढील लिंकवरील फॉर्म भरावा. https://forms.gle/PZiRVgiba35rLDKs9.सबमिट बटण क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप इन्व्हाईट लिंक दिसेल ती क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सहभागी व्हावे. पुढील सूचना त्या समूहावर दिल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क – अजित तिजोरे- 8097617020.