कचरापेटीजवळ नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याची घटना कांदिवलीच्या जुनी म्हाडा कॉलनी परिसरात घडली. एका पिशवीत अर्भक गुंडाळलेले होते. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
कांदिवली पश्चिमच्या चारकोप येथे जुनी म्हाडा कॉलनी आहे. सोमवारी सायंकाळी एका दक्ष नागरिकाला कचरापेटीजवळ एक पिशवी दिसली. त्या पिशवीत नवजात अर्भक गुंडाळलेले होते. याची माहिती त्याने चारकोप पोलिसांना दिली.
त्यानंतर काहीच वेळात चारकोप पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी स्त्राr जातीच्या नवजात अर्भकाला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. ते बालक प्रसूतीपूर्वी जन्माला आल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.