आई आपल्यापेक्षा जास्त बहिणींवर जास्त प्रेम करते या रागातून एका 40 वर्षीय मुलीने 60 वर्षीय आईची हत्या केली आहे. चुनाभट्टी पोलीस ठाण्याअंतर्गत कुरैश नगरमध्ये ही घटना घडली. रेश्मा असे आरोपी मुलीचे तर सबीरा बानो असे मयत आईचे नाव आहे. या हल्ल्यात सबीरा बानो यांचा जागीच मृत्यू झाला.
रेश्माने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिची आई तिच्यावर प्रेम करत नव्हती. बहिणींवर आईचं प्रेम होतं. या कारणातून घरात नेहमी भांडण व्हायचे. याच रागातून रेश्माने टोकाचा निर्णय घेतला. घरी कुणी नसल्याची संधी साधत रेश्माने चाकूने आईवर वार केले. यात तिचा मृत्यू झाला.
आईच्या हत्येनंतर रेश्माने स्वतःहून पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी मुलीला अटक केली आहे. आरोपी रेश्मा ही विवाहित असून तिला तीन मुलं आहेत. रेश्माच्या या कृत्यामुळे तिच्या कुटुंबही उद्धवस्त झाले आहे.