प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोध असल्याने एका जोडप्याने ट्रेनखाली उडी घेत जीवन संपवल्याची घटना मुंबईत घडली. विक्रोळी स्थानकात रविवारी दुपारी ही घटना घडली. मुलगी 15 वर्षांची असून मुलगा 19 वर्षांचा आहे. मुलगी परप्रांतीय आहे तर मुलगा महाराष्ट्रातील आहे.
मयत जोडपे भांडुपमधील हनुमान नगर येथील रहिवासी आहेत. दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. रविवारी दुपारी मुलगी आजीसोबत बाहेर गेली होती. तेथून ती गायब झाली. यानंतर मुलीच्या पालकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली.
पोलीस मुलीचा शोध घेत असताना रेल्वे पोलिसांनी याबाबत माहिती दिल्यानंतर सर्व प्रकरण समोर आलं. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.