खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो… प्रेमी युगुलाची अश्लील कृत्य व्हिडिओत कैद

अनेकवेळा प्रेमाच्या नावाखाली तरुण मुलं-मुली कुठेही खुल्लम खुल्ला चाळे करताना दिसतात. अशावेळी त्यांना सामाजिक भानही राहत नाही. मात्र अशा कृतींचा आसपासच्या लोकांना त्रास होतो. अशीच एक घटना अंधेरी स्थानक परिसरात घडली आहे. एक प्रेमी जोडपे कुठलंही भान न राखता खुले आम प्रेमाच्या मर्यादा ओलांडून अश्लील चाळे करताना व्हिडिओत कैद झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अंधेरी स्थानकात एका कोपऱ्यात उभं राहून हे जोडपं एकमेकांना खुलेआम किस करताना दिसत आहे. तेथून ये-जा करणारे प्रवासी त्यांना पाहत आहेत. मात्र त्यांना काहीच फरक पडत नाही. दोघंही अश्लील चाळे करण्यात मग्न आहेत. तेथे उपस्थित एका प्रवाशाने जोडप्याची लज्जास्पद कृती कॅमेऱ्यात कैद केली आहे.

यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी जोडप्याची खिल्ली उडवली आहे. तर काहींनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.