बाल जल्लोष उत्साहात

पल्लवी फाउंडेशनतर्फे आयोजित बाल जल्लोष हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे कुर्ला नेहरूनगर मनपा शाळा येथे अतिशय उत्साहात पार पडला. यावेळी आयोजित विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ’आजचे हे विद्यार्थी उद्याचा भारत घडवणारे खरे शिल्पकार आहेत. आज त्यांच्यावर चांगल्या संस्कारांची आणि कलागुण जोपासण्याची मेहनत घेणे आवश्यक आहे. त्यासाठी असे कार्यक्रम होत राहणे गरजेचे आहे ’ असे मत त्यांनी व्यक्त केले. पल्लवी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भाऊ कोरगावकर आणि शलाका कोरगावकर मुलांना आनंद वाटेल अशा विविध उपक्रमांचे आयोजन करीत असतात. सकाळी प्रत्येक गटाच्या वेगवेगळ्या वेळेत चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातील प्रत्येक गटातील खालील पाच विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धातील माया परिहार यांच्या हस्ते चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना गौरविले. पल्लवी फाउंडेशनच्या हेमंत काळे, निलेश कोरगांवकर, जयदीप हांडे, पल्लवी पुजारी, तसेच प्रबोधन शाळेच्या शिक्षक व कर्मचारी वृंदाचे सहकार्य यावेळी लाभले.