
मंत्रालयात होणाऱ्या शासकीय बैठकांना हजेरी लावण्याची अनेक मंत्री जिल्हाधिकाऱ्यांना सक्ती करतात. जिह्यातील सर्व कामे बाजूला ठेवत जिल्हाधिकारी घाईघाईत मंत्रालयात हजेरी लावतात, पण जिल्हाधिकाऱ्यांना मंत्रालयात बैठकीसाठी हजेरी लावण्याची सक्ती करणाऱ्या महायुतीमधील मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप लावला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना शक्यतो मंत्रालयात न बोलावता व्हीसीद्वारे बैठक बोलावण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.