
वानखेडे स्टेडियममध्ये आयपीएल सामना पहायला गेलेल्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा आयफोन चोरट्यांनी लांबवला. याप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी मुझफ्फर शेख यांनी पोलिसात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. शेख यांच्या तक्रारीनुसार, मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य न्यायदंडाधिकारी मुझफ्फर शेख हे बुधवारी कुटुंबासह वानखेडे स्टेडियममध्ये रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना पहायला गेले होते. यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्याने शेख यांच्या खिशातील आयफोन चोरला.
मरीन ड्राईव्ह पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पोलिस स्टेडियममधील आणि स्टेडियमभोवती बसवलेले सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत.