लोकल प्रवाशांची ‘मेगा’ रखडपट्टी

उपनगरी लोकलच्या प्रवाशांची येत्या रविवारी ‘मेगा’ रखडपट्टी होणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत तसेच पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याचवेळी हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नसल्याने इथल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेवर ब्लॉक काळात सकाळी 10.58 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱया डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील. तसेच ठाण्यापुढे जाणाऱया जलद गाडय़ा मुलुंड येथे पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. सकाळी 11.25 ते दुपारी 3.27 पर्यंत ठाणे येथून सुटणाऱया अप जलद मार्गावरील गाडय़ा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या लोकल मुलुंड ते माटुंगादरम्यान नियोजित थांब्यांवर थांबतील. पुढे माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील.