मध्य रेल्वेवर कर्जत-भिवपुरी स्थानकादरम्यान गुरुवारी सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. रेल्वेसेवा खंडित झाल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. कर्जतजवळ वाहतूक ठप्प झाल्याने बदलापूरहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे उशिराने धावत आहेत. लोकलसह एक्सप्रेस गाड्यांचेही वेळापत्रक कोलमडले आहे.