मध्य रेल्वे विस्कळीत, लोकल सेवा 20 ते 25 मिनिटं उशिरानं सुरू

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा मंगळवारी सकाळी विस्कळीत झाली. सकाळच्यावेळी तांत्रिक कारणामुळे लोकल जवळपास 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे कार्यालयीन कामकाजासाठी घरातून वेळेत बाहेर पडलेल्या चाकरमान्यांना लेटमार्क लागला.