केअरटेकरनेच मारला हिरे व्यापाऱ्याच्या घरी डल्ला, जुहू पोलिसांकडून आरोपीला अटक

हिरे व्यापाऱ्याच्या घरी चोरी करून पळून गेलेल्या केअरटेकरला जुहू पोलिसांनी बेड्या ठोकल्या. झिशान फैजुल अन्सारी असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. विलेपार्ले परिसरात हिरेविक्रेते राहतात. त्याच्या घरी पाच नोकर कामाला आहेत. झिशान हा तक्रारदार याच्या आईवडिलांना केअरटेकर म्हणून काम करायचा.

नोव्हेंबर महिन्यात झिशान हा गावी जातो असे सांगून निघून गेला. 12 डिसेंबरला तक्रारदार हे त्याच्या वडिलांच्या रूममधील कपाटाची तपासणी करत होते. तेव्हा त्यांना दागिने दिसून आले नाहीत. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने नोकराकडे विचारपूस केली. त्यानंतर त्याने झिशानला फोन केला. त्याने त्याना काही प्रतिसाद दिला नाही. अखेर तक्रारदार याने जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी झिशानविरोधात गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी झिशानला ताब्यात घेऊन अटक केली.