Rishi Sunak : ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मुंबईत लुटला क्रिकेटचा आनंद, केली तुफान फटकेबाजी

ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक हे सध्या हिंदुस्थान दौऱ्यावर आहेत. यातच रविवारी त्यांनी दक्षिण मुंबईतील पारसी जिमखान्याला भेट देऊन क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी ऋषी सुनक यांनी तुफान फटकेबाजी केली. पारसी जिमखान्यात क्रिकेट खेळतानाचा एक फोटोही त्यांनी X वर शेअर केला आहे. फोटो शेअर करत ते म्हणाले आहेत की, ”मी अनेकवेळा बाद होण्यापासून वाचलो, याचा मला आनंद आहे.” ते म्हणाले की, ‘टेनिस बॉल क्रिकेट खेळल्याशिवाय मुंबईचा कोणताही दौरा पूर्ण होऊ शकत नाही.

यावेळी पत्रकरांशी संवाद साधताना ऋषी सुनक म्हणाले की, ”पारसी जिमखाना क्लबच्या वर्धापन दिन सोहळ्यात तुम्हा सर्वांसोबत राहून खूप आनंद झाला. इतका ऐतिहासिक आणि रोमांचक खेळ आहे हा, मी आज खूपवेळा बाद होण्यापासून वाचलो.”

दरम्यान, पारसी जिमखाना 1884 मध्ये स्थापन करण्यात आला. याच्याच वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमात ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक सहभागी झाले होते.