
बेस्टच्या बसला गुरुवारी रात्री चर्चगेट स्थानकाबाहेर आग लागली. बसला आग लागल्याने प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. चर्चगेट स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 बाहेर आग लागल्याने फास्ट लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर वळवण्यात आली होती.
जे मेहता मार्गाकडे जाणाऱ्या बेस्ट बसला चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ रात्री 9.52 वाजता आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान बसला आग कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. याबाबत तपास सुरू आहे.