अवयवदानामुळे 9 जणांना मिळाले जीवनदान

जे.जे. शासकीय रुग्णालयात अवयवदानामुळे 9 गरजू रुग्णांना जीवनदान मिळाले. आता सर्वच शासकीय रुग्णालयांत अवयवदानाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जे.जे. रुग्णालयातून या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

जळगाव येथील अपघातात जखमी ट्रकचालक विलास पाटील (36) यांना तातडीच्या उपचारासाठी जे.जे.त दाखल करण्यात आले होते. शर्थीचे प्रयत्न करूनही ते शुद्धीत येत नसल्याने त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले. यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे, समाजसेवा अधीक्षक सुनील पाटील, राजेंद्र पुजारी आणि मेट्रन योजना बेलदार यांनी प्रक्रिया तत्काळ पूर्ण केली. यामुळे 9 जणांना जीवनदान मिळाले.