Mumbai News – मुंबई विमानतळावर पावणे सात किलो सोनं जप्त, एका प्रवाशाला अटक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी एका प्रवाशाकडून डीआयआरने पावणे सात किलो सोनं जप्त करण्यात आलं. हा प्रवासी बँकॉकहून मुंबईत आला आहे. विमानतळावर अंगझडती घेताना प्रवाशाच्या बुटात 14 सोन्याचे बार सापडले. सदर प्रवाशाला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

अटक करण्यात आलेला प्रवासी बँकॉकहून मुंबईत सोने तस्करी करत होता. मात्र डीआयआरच्या सतर्कतेमुळे त्याचा हा प्रयत्न फसला. मुंबई विमानतळावर उतरताच सुरक्षा तपासणीदरम्यान अंगझडती घेतली असता त्याच्या बुटात सोन्याचे बार सापडले. या सोन्याची बाजारातील किंमत सुमारे 6.30 कोटी इतकी आहे. या तस्करीत कोणत्या टोळीचा सहभाग आहे, याबाबत पोलीस तपास करत आहेत.