मध्य रेल्वेवर धावणार अतिरिक्त 14 एसी लोकल

ac_local_train_700x450

राज्याच्या ग्रामीण भागाप्रमाणेच मुंबई शहरातही उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. गर्दीच्या लोकल प्रवासात मुंबईकर घामाघूम होत आहेत. उन्हाळ्यात प्रवाशांना होत असलेला हा त्रास विचारात घेत मध्य रेल्वे प्रशासनाने उन्हाळ्यात मेन लाईनवर अतिरिक्त 14 एसी लोकल चालवण्याचे नियोजन सुरू केले आहे. मुंबईकरांकडून एसी लोकलला मिळत असलेला वाढता प्रतिसाद लक्षात घेत एसी लोकलची संख्या वाढवण्यात येणार आहे. नवीन एसी लोकलच्या फेऱ्या नियमित लोकलच्या वेळेत चालवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर एसी लोकलचे तिकीट काढूनही प्रवाशांना गर्दीमुळे आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येत नाही. याबाबत प्रवाशांनी तक्रारी केल्यानंतर मध्य रेल्वेने अतिरिक्त 14 एसी लोकल चालवण्याचे नियोजन सुरू केले आहे. सद्यस्थितीत मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर एसी लोकलच्या 66 फेऱ्या चालवल्या जात आहेत. त्यात अतिरिक्त 14 एसी लोकलची भर पडणार आहे.