Mumbai News – गोवंडी येथे बेस्टने तरुणाला चिरडले, जागीच मृत्यू

गोवंडीतील शिवाजी नगर येथे बेस्ट बसच्या चाकाखाली येऊन एका 25 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचे समजते. दिक्षित विनोद राजपूत असे त्या तरुणाचे नाव आहे.

शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास सदर बस गोवंडीतील शिवाजीनगर बस डेपोतून कुर्ला येथे जाण्यासाठी निघाली होती. ही बस डेपोतून बाहेर पडल्यानंतर काही वेळातच बसच्या उजव्या बाजूने एक दुचाकी ओव्हरटेक करत असतानाच ती बसच्या चाकाखाली आली. यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून बस गेल्याने तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दुचाकीस्वाराला तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.