
मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटात रविवारी विचित्र अपघात घडला. कंटेनरने मागून दिलेल्या धडकेने सात गाड्या एकमेकांवर जबरदस्त आदळल्या. या अपघातात 13 ते 14 जण जखमी झाले आहेत. महामार्ग पोलिसांचे रूट पेट्रोलिंग पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्या एकमेकांवर आढळल्या. पावसाळ्यात कसारा घाटात अनेक ठिकाणी धबधबे वाहू लागतात. या धबधब्याजवळ लोक येऊन उभे राहतात. सुदैवाने त्यावेळी गाडीतील बरीच लोकं वाहने येथे पार्क करून पावसाचा आनंद लुटत होते, त्याचवेळी हा अपघात झाला. वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.