अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय हवेय? सूचना पाठवा, पालिकेचे आवाहन

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये मुंबईकरांचा लोकसहभाग असावा यासाठी महानगरपालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. यानुसार पालिकेच्या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय हवेय याबाबत आपल्या सूचना शुक्रवार, 17 जानेवारी 2025 पर्यंत [email protected] या ई–मेलवर किंवा  पालिका मुख्यालयात पाठवाव्यात, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.