
मेट्रो-3 मार्गिकेवरील मोबाईल सेवा मॉडेलला भारती एअरटेल, रिलायन्स जिओ व व्होडापह्न-आयडिया या दूरसंचार कंपन्या व त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱया ‘सीओएआय’ असोसिएशनने तीव्र विरोध केला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे (एमएमआरसी) मोबाईल सेवा मॉडेल बेकायदेशीर आणि ग्राहकविरोधी असल्याचा दावा ‘सीओएआय’ने केला आहे. एमएमआरसीने मेट्रो-3 मार्गिकेवर श्रेणी-1 विव्रेत्याच्या माध्यमातून दूरसंचार पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय दूरसंचार अधिनियम 2023 च्या तरतुदींना धक्का देणारा आहे. सध्याच्या परवाना धोरणानुसार पायाभूत सुविधा पुरवठादार श्रेणी-1 विव्रेत्यांना सक्रिय दूरसंचार संरचना उभारण्यास मनाई आहे. एमएमआरसीने परवानाप्राप्त व तांत्रिकदृष्टय़ा सुसज्ज दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्यांना डावलले आहे. एमएमआरसीचा हा निर्णय सार्वजनिक हिताऐवजी व्यावसायिक फायद्याला प्राधान्य देणारा आहे, असा आरोप ‘सीओएआय’ने केला आहे.