
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) 2025-26 आर्थिक वर्षासाठीचा 40 हजार 187 कोटी 41 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. एमएमआरडीएचे अंदाजित उत्पन्न 36 हजार 938 कोटी 69 लाख रुपये इतके असून वित्तीय तूट 3 हजार 248 कोटी 72 लाख रुपये इतकी आहे. वित्तीय तूट भरून काढण्यासाठी एमएमआरडीएकडील अतिरिक्त जमिनीची विक्री करण्यात येणार आहे. त्याशिवाय वित्तीय संस्थांकडील कर्जाद्वारे तूट भरून काढण्याचे नियोजन आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा 40 हजार 187 कोटी 41 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आज महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सादर केला.
अर्थसंकल्पात प्रकल्पांसाठी निधीची तरतूद ः z मेट्रो प्रकल्प मार्ग 2 ब ः डी.एन. नगर – मंडाळे – रू. 2,155.80 कोटी z मेट्रो प्रकल्प मार्ग 4 ः वडाळा – घाटकोपर – मुलुंड – ठाणे – कासारवडवली – रू. 3,247.51 कोटी z मेट्रो प्रकल्प मार्ग 5 ः ठाणे – भिवंडी – कल्याण – रू. 1,579.99 कोटी z मेट्रो प्रकल्प मार्ग 6 ः स्वामी समर्थ नगर – कांजूर मार्ग -रु. 1,303.40 कोटी z मेट्रो प्रकल्प मार्ग 9 ः दहिसर ते मीरा-भाईंदर व 7 अ (अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) – रु. 1,182.93 कोटी z मेट्रो प्रकल्प मार्ग 12 ः कल्याण – तळोजा – रु. 1,500.00 कोटी z विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प राबविणे – रू. 521.47 कोटी z ठाणे ते बोरिवली (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) 4 पदरी भुयारी मार्ग – रु. 2,684.00 कोटी z मुंबई शहरातील ऑरेंज गेट, पूर्व मुक्त मार्ग ते मरीन ड्राइव्ह येथून सागरी किनारा मार्गापर्यंत वाहतुकीच्या दळणवळणासाठी भुयारी मार्गाचे बांधकाम – रु. 1,813.40 कोटी z उत्तन ते विरार सागरी किनारा प्रकल्प – रु. 2,000.00 कोटी.