शिवसेना पक्षाचे नवी मुंबईतील तुर्भे विभागाचे उपशहरप्रमुख महेश कोटीवाले यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री निवासस्थानी करण्यात आले. यावेळी युवासेना सचिव-आमदार वरुण सरदेसाई, विभागप्रमुख सुरेश पाटील, सिद्धराम शिलवंत, युवासेना बेलापूर विधानसभा चिटणीस इस्माईल शेख, शाखा युवाधिकारी आनंद गुप्ता, महेश शिंदे आदी उपस्थित होते.
n शिवसेना आमदार महेश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शाखा क्र. 194 आणि युवासेना मुंबई समन्वयक अभिषेक पाताडे यांच्यावतीने ‘आगरी समाज महोत्सव 2024’ अंतर्गत प्रभादेवीमध्ये आयोजित केलेल्या भव्य शोभायात्रेमधील समाजबांधवांना शीतपेय वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला शाखाप्रमुख शैलेश माळी, चंदन साळुंखे, माधवी सावंत, रेखा देवकर, हिरू दास, संजना पाटील, रणजित कदम, साईश माने, प्रणित खडपे, प्रथमेश बिडू, जीत वीरा, गीतांजली मोरजकर-साटम, राजीता वैद्य, अमोल जरारे, सुशांत जरारे, आकाश सरवदे आदी उपस्थित होते.