
लोकलने प्रवास करताना तुम्हाला टीसीने तुम्हाला थांबवून तिकीट विचारलं तर तुम्हाला 10 ते 50 हजार रुपये बक्षीस मिळू शकतं. तुम्हाला हे खोटं वाटेल, पण हे खरं आहे. कारण रेल्वे लवकरच प्रवाशांसाठी लकी यात्रा योजना आणणार आहे. प्रवाशांन तिकीट, पास विकत घेऊन प्रवास करावा यासाठी रेल्वे ही योजना आणणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी सरकार स्वतःचे पैसे वापरणार नाहिये.
टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. मुंबई लोकलमधून दररोज 40 लाख प्रवाशी प्रवास करतात. त्यापैकी 20 टक्के प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. रेल्वे दररोज 4 ते 5 हजार प्रवाशांना पकडून त्यांच्यावर दंड आकारतात.
प्रवाशांनी तिकीट काढून प्रवास करावा यासाठी रेल्वेने लकी यात्री योजना आणली आहे. या योजनेनुसार प्रवाशाला जर टीसीने तिकीट विचारलं तर नशीबवान प्रवाशाला 10 हजार रुपये मिळू शकतात. रेल्वेने दिवसाला 10 हजार तर आठवड्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. कुणाला बक्षीस द्यायचे याचा निर्णय टीसी घेणार. रेल्वे प्रशासन प्रवाशाची माहिती तपासून घेणार, त्यानंतर या प्रवाशाला हे बक्षीस मिळेल.
मुंबईच्या कुठल्याही स्थानकावर टीसीकडून तिकीट तपासले जातील आणि त्यातून लकी प्रवासी निवडले जातील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे पैसे प्रवाशांच्या खिशातून दिले जाणार नाही. एफसीबी इंटरफेस कम्युनिकेशन कडून ही योजना प्रायोजित केली जाणार आहे. पुढील आठवड्यापासून ही योजना दोन महिन्यांपासून राबवली जाईल अशी माहिती रेल्वेने दिली आहे.