
देशातील पहिला नर्सिंग एक्सलन्स ट्रेनिंग प्रोग्राम मुंबईतील लीलावती रुग्णालयात यशस्वीरित्या संपन्न झाला. 17 ते 26 मार्चदरम्यान हा अभूतपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमात सर्वसमावेशक अभ्यासक्रम समाविष्ट असून तो 120 परिचारिकांचे कौशल्य वाढवण्यासाठी डिझाईन करण्यात आलेला आहे. प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केलेल्या परिचारिकांचा एका सोहळ्यात विश्वस्त आणि इतर मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. रुग्णसेवेची सर्वेच्च गुणवत्ता प्रदान करण्यासाठी आरोग्यसेवा व्यावसायिकांना सक्षम बनवण्यावर आम्ही विश्वास ठेवतो असे लीलावती रुग्णालयाचे स्थायी विश्वस्त प्रशांत मेहता म्हणाले.