
भारतीय कामगार सेना मुंबई रुग्णालय युनिटच्या पाठपुराव्यामुळे रुग्णालयातील शेकडो कामगारांना भरघोस पगारवाढ मिळाली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना 9 हजार 250 रुपयांपासून 11 हजार 300 रुपयांपर्यंत वाढ मिळाली. भारतीय कामगार सेना मुंबई रुग्णालय युनिटच्या पाठपुराव्याने ही पगारवाढ मिळाल्यामुळे कामगारांनी आज रुग्णालयामध्ये प्रचंड जल्लोष करीत गुलाल उधळला. यावेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत उपस्थित होते.
मुंबई रुग्णालय युनिटच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून रुग्णालय प्रशासनाकडे पगारवाढीसाठी पाठपुरावा करण्यात येत होता. शिवसेना उपनेते संजय सावंत यांनी पगारवाढीची मागणी लावून धरत प्रशासनाकडे याबाबत वारंवार बैठका घेतल्या. सरकारकडून भांडवलदार आणि मालकधार्जिण्या कायद्यांविरोधात लढा देण्यात आला. शेकडो कर्मचाऱ्यांनीही या पगारवाढीसाठी तब्बल दोन वर्षांची प्रतीक्षा करीत संयम दाखवला. उपनेते संजय सावंत यांनीदेखील कामगारविरोधी कायदे आणि धोरणांचा जोरदार विरोध केला. अखेर रुग्णालय प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा करार केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी जोरदार जल्लोष केला. यावेळी मेडिकल डायरेक्टर डॉ. राजकुमार पाटील, फायनान्स पंट्रोलर राजकुमार अगरवाल, पर्चेस डायरेक्टर मनोज सिंघल आणि डायरेक्टर सिस्टमचे मनीष वेद यांच्यासह युनिटचे सदस्य उपस्थित होते.
अशी आहेत अन्य वैशिष्टय़े
कर्मचाऱ्यांना कॅज्युअल लिव्ह, सिक लिव्ह आणि प्रिव्हिलेज लिव्ह सध्या असलेल्या प्रमाणात मिळणार आहे. तर मॅटर्निटी लिव्ह, दहा दिवस नॅशनल हॉलिडेज, लिव्ह अॅन्कॅशमेंट, मेडिकल फॅसिलिटी आणि निवृत्त कामगारांना पाच लाखांपर्यंत मेडिक्लेम पॉलिसी देण्याचा निर्णयही करारानुसार निश्चित करण्यात आला. विशेष म्हणजे विद्यमान कामगारांच्या नोकरीला कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही, असा निर्णयही घेण्यात आला. या करारावर भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, कार्यकारी अध्यक्ष अजित साळवी, चिटणीस संजय सावंत, मुंबई रुग्णालय युनिट अध्यक्ष राजेशेखर नायर, सेव्रेटरी दिलीप गायकवाड यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
अशी झाली वाढ
भारतीय कामगार सेना आणि मुंबई रुग्णालय युनिटमध्ये झालेल्या कराराचा कालावधी 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2028 पर्यंत राहणार आहे. यामध्ये एल 1 ते एल 5 पर्यंत 9250, सी1 ते सी 2 – 9650 आणि सी 3 ते सी 5 पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना 11,300 रुपयांची पगारवाढ मिळाली.
पगारवाढीच्या पॅकेजसह सी-आर्म, हिट अलाऊन्स, रेडिएशन अलाऊंन्स, कॅश अलाऊन्समध्ये 60 टक्के वाढ करण्यात आली आहे. शिवाय 2034 पर्यंत 20 टक्के बोनस, फेस्टिव्हल अॅडव्हान 18 हजार 21 हजारांपर्यंत.