Mumbai Hit And Run घटनेनंतर मिहीरचे गर्लफ्रेंडला 40 कॉल, तिच्या घरी दोन तास केला आराम

मुंबई वरळीतील हिट अँड रन प्रकरणी पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर मिहीरने त्याच्या गर्लफ्रेंडला 40 कॉल केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. घटनेनंतर मिहीर वरळीतून वांद्रे येथे आला. तो गर्लफ्रेंडशी बोलला. त्यानंतर रिक्क्षाने तो गोरेगावला गेला. गर्लफ्रेंडच्या घरी दोन तास आराम केल्यानंतर तो बहीणीसोबत गेला, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

ही घटना रविवारी वरळी भागात घडली. त्या दिवशी मिहीरने त्याच्या गर्लफ्रेंडला 40 कॉल केले होते. या प्रकरणी पोलीस मिहीरच्या गर्लफ्रेंडची चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो नशेच्या अवस्थेत होता का, तसेच या प्रकरणातील महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे. घटनेनंतर मिहीर स्वतःच्या घरी गेला नाही. तो वांद्रे येथे गेला. त्यानंतर गर्लफ्रेंडशी फोनवर बोलला. त्यानंतर रिक्क्षाने तो गोरेगावला गेला. गर्लफ्रेंडच्या घरी दोन तास आराम केल्यानंतर तो बहीणीसोबत गेला, अशी महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे.