वरळीत एका हिट अँड रन मध्ये महिलेचा मृत्यू झाला होता. आता वांद्र्यात हिट अँड रनच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. या दुर्घटनेत ४९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
मिळाल्या माहितीनुसार पाच सप्टेंबरला संजय उदानी हे आपली पत्नी सुनीला उदानी सोबत मालाडला जात होते. उदानी दाम्पत्या शिवाजी पार्कचे रहिवासी असून मालाडमध्ये ते जुन्या घरी जात होते. तेव्हा वांद्र्यात पश्चिम द्रुतगती मार्गावर वाकोल पुलाजवळ त्यांच्या बाईकला धडक लागली. ज्या गाडीची धडक लागली तो चालक तिथून फरार झाला. या दुर्घटनेत उदानी दाम्पत्य गंभीर जखमी झाले. सुनिला यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
संजय उदानी यांची तब्येत सुधारल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.