छोटा राजनच्या हस्तकांची जन्मठेप कायम

गँगस्टर छोटा राजनच्या दोन हस्तकांची हत्येप्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने मंगळवारी कायम केली. मोहम्मद अली शेख व प्रणय राणे, अशी या दोन आरोपींची नावे आहेत. सत्र न्यायालयाने या दोघांना 2022 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात त्यांनी अपील याचिका केली होती. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डा. नीला गोखले यांच्या खंडपीठाने ही अपील याचिका फेटाळून लावत आरोपींच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले.