तक्रारदार महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे पोलिसाला भोवले, हायकोर्टाने दिले चौकशीचे आदेश

तक्रारदार महिलेला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे पोलीस उपनिरीक्षकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. या पोलिसाची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले.

समता नगर पोलीस ठाण्यात हे पोलीस उपनिरीक्षक कार्यरत आहेत. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डा. नीला गोखले यांच्या खंडपीठाने त्यांची चौकशी करण्याचे आदेश डीसीपींनी दिले आहेत. पोलिसांचे असभ्य वर्तन खपवून घेणार नाही, असेही न्यायालयाने बजावले.

वेळ मिळतोच कसा?

पोलीस उपनिरीक्षकावर पोलीस ठाण्याची जबाबदारी असते. कामाचा ताण अधिक असतो. असे असताना सोशल मीडियावर ऍक्टिव राहायला वेळ मिळतोच कसा, असा सवाल खंडपीठाने केला.