
आरोपी असला तरी तो आधी माणूस आहे हे विसरून चालणार नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) कान उपटले.
वैद्यकीय प्रवेशात तब्बल 65.7 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले महादेव देशमुख यांचा जामीन मंजूर करताना न्यायालयाने ईडीला चांगलेच फटकारले. देशमुख हे वयोवृद्ध आहेत. आजारी आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते कारागृहात आहेत. ते कारागृहात आहेत हा मुद्दा ग्राह्य धरू नये, असे ईडीचे म्हणणे आहे. मात्र देशमुख यांच्या व्याधीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांना तीन लाख रुपयांचा जामीन मंजूर केला जात आहे, असे न्या. मिलिंद जाधव यांच्या एकल पीठाने स्पष्ट केले.
तुम्हाला कोणीही रोखलेले नाही
देशमुख यांचा गुन्हा गंभीर असल्यास त्यांच्या विरोधातील खटला ईडीने जलदगतीने चालवायला हवा. यासाठी त्यांना कोणीही रोखलेले नाही, असे खडेबोल न्यायालयाने सुनावले.