
गृहनिर्माण सोसायटीच्या नोंदणीसाठी 51 टक्के सदस्यांच्या संमतीची गरज नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य शासनाने परिपत्रकाद्वारे ही सक्ती केली आहे. मात्र हे परिपत्रक नोंदणीसाठी असलेल्या कायद्याच्याविरुद्ध आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्या. अमित बोरकर यांच्या एकल पीठाने हा निर्वाळा दिला. तसेच बोरीवलीतील एका सोसायटीची नोंदणी करून घेण्याचे आदेश न्यायालयाने निबंधकांना दिले आहेत. अमी धरा, असे या सोसायटीचे नाव आहे. 1989 मध्ये या इमारतीचे बांधकाम झाले आहे. तब्बल 36 वर्षांनी या सोसायटीची नोंदणी होणार आहे.
काय आहे प्रकरण
इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विकासकाने सोसायटीची नोंदणी करणे आवश्यक आहे. या इमारतीचे बांधकाम 1989 मध्ये पूर्ण झाले. यात 22 घरे आहेत. 4 दुकाने आहेत. विकासकाने सोसायटीची नोंदणी न केल्याने यातील 12 जणांनी नोंदणीसाठी अर्ज केला. उर्वरित 14 पैकी 6 घरांचा ताबा विकासकाकडे आहे. त्यानेही विकासक म्हणून ना हरकत दिली. मात्र 51 टक्के सदस्यांची मंजूरी असेल तरच नोंदणी होते असे सांगत निबंधकाने हा अर्ज फेटाळून लावला. त्याविरोधात सोसायटीने अॅड. विनोद सांगवीकर यांच्यामार्फत याचिका केली. ही याचिका कोर्टाने मंजूर केली. सोसायटीचे नाव आहे. 1989 मध्ये या इमारतीचे बांधकाम झाले आहे. 36 वर्षांनी या सोसायटीची नोंदणी होणार आहे.
काय आहे प्रकरण
इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विकासकाने सोसायटीची नोंदणी करणे आवश्यक आहे. या इमारतीचे बांधकाम 1989 मध्ये पूर्ण झाले. यात 22 घरे आहेत. 4 दुकाने आहेत. विकासकाने सोसायटीची नोंदणी न केल्याने यातील 12 जणांनी नोंदणीसाठी अर्ज केला. उर्वरित 14 पैकी 6 घरांचा ताबा विकासकाकडे आहे. त्यानेही विकासक म्हणून ना हरकत दिली. मात्र 51 टक्के सदस्यांची मंजूरी असेल तरच नोंदणी होते असे सांगत निबंधकाने हा अर्ज फेटाळून लावला. त्याविरोधात सोसायटीने अॅड. विनोद सांगवीकर यांच्यामार्फत याचिका केली. ही याचिका कोर्टाने मंजूर केली.
कायद्यात सक्ती नाही
महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट कायद्यांतर्गत सोसायटीची नोंदणी होते. या कायद्यात नोंदणीसाठी किती सदस्य असावेत याची सक्ती करण्यात आलेली नाही. किमान सदस्यदेखील सोसायटीची नोंदणी करू शकतील, असे कायद्यात नमूद आहे. विधिमंडळात हा कायदा तयार झाला आहे. राज्य शासनाचे परिपत्रक या कायद्याच्या पुढे जाऊन नोंदणीसाठी 51 टक्के सदस्यांची सक्ती करु शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.