‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर, तातडीने चित्रपट प्रदर्शित करण्यास हायकोर्टाचा नकार

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत हिची प्रमुख भूमिका असलेला ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायझेस लिमिटेडने उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर सुनावणी करत मुंबई उच्च न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला 18 सप्टेंबरपर्यंत सर्व प्रमाणपत्रांवर निर्णय घ्या, असे निर्देश दिले आहेत. ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता. परंतु कोर्टाच्या या निर्णयामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता 18 सप्टेंबरपर्यंत लांबणीवर पडली आहे. ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट माजी कंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सेन्सॉर बोर्डाने बेकायदेशीररीत्या आणि मनमानी पद्धतीने चित्रपटाचे प्रमाणपत्र रोखले आहे, असा दावा कंपनीने याचिकेत केला होता.