मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी 31 जानेवारीपर्यंत वांद्रे येथे 5.25 एकर जागेचा उर्वरित भाग सुपूर्द करणार असल्याचे राज्य सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात सांगितले. पहिल्या टप्प्यात 4.39 एकर जमीन ऑक्टोबर 2024 मध्ये उच्च न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात आली होती. दुसऱया टप्प्यातील 5.25 एकर जमिनीचा ताबा गतवर्षी डिसेंबर अखेरपर्यंत सुपूर्द करण्यात येईल, असे राज्य सरकारने न्या. बी. आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला सांगितले होते. 31 जानेवारीपर्यंत वेळ मागत असून जी जमीन 31 डिसेंबर 2024 पर्यंत द्यायची होती ती सुपूर्द केली जाईल, असे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी खंडपीठाला सांगितले.