हायकोर्टात नेता येणार प्लॅस्टिकची पाण्याची बॉटल

सिंगल युज प्लॅस्टिक पाण्याची बॉटल आता मुंबई उच्च न्यायालयात नेता येणार आहे. पर्यावरणाला हानीकारक असल्याने या बॉटल न्यायालयात आणण्यास मनाई करण्यात येत असल्याचे आदेश माजी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी काढले होते. दरम्यान, उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली झाली आणि अलोक अराध्ये हे नवीन मुख्य न्यायमूर्ती झाले. यानंतर ही बंदी रद्द करण्यासाठी वकिलांनी मुख्य न्यायमूर्ती अराध्ये यांना पत्र लिहिले होते. मुख्य न्यायमूर्तींच्या आदेशाने न्यायालय प्रशासनाने ही बंदी आता मागे घेतली आहे.