महिलेला शारीरिक स्वायत्ततेचा अधिकार

महिलेला शारीरिक स्वायत्ततेचा अधिकार तसेच निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने 26 आठवडय़ांच्या गर्भवतीला गर्भपाताची परवानगी दिली.

मुंबईतील 32 वर्षीय गर्भवती महिलेला गर्भाच्या इको कार्डिओग्राफीदरम्यान गर्भात एक विसंगती आढळली, अर्भकात दोष असल्याने बाळाला जन्म दिल्यास बाळाची जगण्याची शक्यता कमी तसेच आईच्या जिवाला धोका निर्माण होणार असल्याने महिलेने गर्भपात करण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती.