अल्पवयीन मुलगी स्वेच्छेने पळून गेली; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन

अल्पवयीन मुलीला उत्तर प्रदेश येथे पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचा मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. अल्पवयीन मुलगी स्वेच्छेने त्याच्यासोबत पळून गेली असून दहा महिने ती त्याच्यासोबत राहिली, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. 25 वर्षांचा आरोपी व 15 वर्षांची पीडिता यांच्यात प्रेम संबध होते. आरोपीने पीडितेला दिल्ली त्यानंतर उत्तर प्रदेश येथील गावी नेल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी आरोपीला 2019 साली अटक केली. या प्रकरणी जामीन मिळावा म्हणून आरोपीने हायकोर्टात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. आरोपीने चार वर्षे तुरुंगात घालवली असून पीडिता स्वेच्छेने त्याच्यासोबत राहिली. तसेच त्याने जबरदस्ती केल्याचे व या प्रकरणी तिने तक्रार आणि प्रतिकार केला नसल्याचे दिसून येत असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर केला.