मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांचा आज शपथविधी

मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांचा शपथविधी सोहळा मंगळवारी पार पडणार आहे. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे न्यायमूर्ती आलोक आराधे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ देतील. मावळते मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली झाली आहे.