मुंबई – हार्बर मार्गावरील रेल्वे उशिराने सुरु आहे. वाशी स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरु असल्याचे समजते. सकाळी 9.45 ते 10.15 दरम्यान सीएसएमटीकडे येणारी लोकल वाहतूक सेवा बंद होती. आता रेल्वे वाहतूक सुरु झाली असली तरी अप आणि डाऊन या दोन्हा मार्गावरील गाड्या उशीराने धावत आहेत. त्यामुळे आठवड्याच्या दुसऱ्यात दिवशी कामाच्या वेळेत प्रवाशांचे हाल झाले आहेत.