
सूर्यकुमार यादव आणि रायन रिकलटन यांची अर्धशतकीय खेळी, आणि शेवटच्या षटकांमध्ये नमन गिरणी केलेली फटकेबाजी यामुळे मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्स संघासमोर विजयासाठी 216 धावांचे आव्हान ठेवले आहे. सूर्यकमारने 54 तर रिकलटन याने 58 धावांचे योगदान दिले. नमन धीर 11 चेंडूत 25 धावा काढून नाबाद राहिला.
लखनऊचा कर्णधार ऋषभ पंत याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईकडून रोहित शर्मा आणि रिकलटन हे सलामीला आले. रोहित शर्माने दोन षटकार ठोकून दणदणीत सुरुवात केली, मात्र आणखी एक मोठा फटका मारण्याचा नादात तो बाद झाला. त्यानंतर रिकलटन आणि विल जॅक्स या जोडीने वेगाने धावा जमवत अर्धशतकीय भागीदारी केली. प्रिन्स यादवने जॅक्सला 29 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
त्यानंतर रिकलटन आणि सूर्यकमार यादव यांनी वानखेडेवर चौफेर फटकेबाजी केली. रिकलटन अर्धशतकानंतर बाद झाला. तिलक वर्मा ही 6 धावांवर आल्या पावली माघारी गेला. पाठोपाठ हार्दिक पंड्या यालाही मयंक यादव याने बोल्ड केले. यानंतर सूर्यकुमार आणि नमन धीर यांनी चौकार, षटकारांची आतिषबाजी करत संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. पहिला सामना खेळणाऱ्या कॉर्बीन बॉस्क यानेही 10 चेंडूत 20 धावा केल्या. लखनऊ कडून मयंक यादव आणि आवेश खान याने प्रत्येकी 2 तर प्रिन्स यादव, रवी बिश्नोई आणि दिग्वेश राठीने प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.