आईसोबत वाद झाल्याने घराबाहेर… सहा नराधमांनी केला सामूहिक बलात्कार

दिवाळीनिमित्त आपल्या कुटुंबियांसोबत पाँडेचेरी येथे नातेवाईकांकडे दिवाळी साजरी करायला गेलेल्या एका 16 वर्षाच्या मुलीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. सदर मुलगी ही मुळची मुंबईची असून तिच्यावर एका रिक्षा चालकासह सहा पर्यटकांनी बलात्कार केला.

सदर मुलगी आपल्या पालकांसोबत पाँडेचेरी येथे गेली होती. 30 ऑक्टोबरला रात्री नऊच्या सुमारास तिचे आईसोबत भांडन झाले. त्यानंतर ती घरातून बाहेर पडली व तिने टुरिस्ट ठिकाणांवर जायला रिक्षा पकडली. मात्र रिक्षाचालक मोईइद्दीन याने तिला जायचे होते त्या ठिकाणी न घेता तिला दारू पाजली. त्यानंतर तो तिला कोट्टाकुप्पम येथील त्याच्या घरी घेऊन गेला. तिथे तिच्यावर बलात्कार केला व दुसऱ्या दिवशी तिला ऑरोविल येथे सोडले. तिथे काही तरुणांनी तिला चेन्नईला एका मैत्रिणीकडे सोडतो असे आश्वासन देत स्वत:सोबत नेले. त्यानंतर आळीपाळीने त्या पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केली. दुसऱ्या दिवशी त्यांनी तिला बिच रोडवर सोडले. तिथे ती बेशुद्धावस्थेत पडलेली सापडली.

दरम्यान मुलीच्या पालकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांना बिच रोडवर मुलगी आढळून आल्याची माहिती मिळताच त्यांनी तिच्या पालकांना कळवले. त्यानंतर तत्कार मुलीला रुग्णालयात दाखल केले असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत रिक्षा चालक व तीन पर्यटाकांना अटक केली आहे. दोन जण अद्याप फरार आहेत.