बाजारात पाडव्याचा गोडवा

हिंदू नववर्षाची सुरुवात असलेल्या गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे. पूजेसाठी लागणाऱ्या हार-फुलांसह, कडुलिंबाचा पाला, आंब्याचे डहाळे, साखरमाळ, रांगोळय़ा यांच्यासह सोने-चांदीचे दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी दादर, लालबाग-परळसह बोरिवली, क्रॉफर्ड मार्पेट अशा बाजारपेठांमध्ये शनिवारी नागरिकांची झुंबड उडाली. एरव्ही 30 ते 40 रुपये किलो दराने मिळणाऱ्या झेंडूसाठी 80 ते 100 रुपये मोजावे लागत होते.