
उन्हाळ्याला सुरुवात झाली असून मुंबईसह राज्यातील सर्वच जिल्ह्यात वाढत्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यातच मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये आता एकूण 39 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे मान्सूनच्या आगमनाचे अंदाजित वेळापत्रक पाहता पालिकेला जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत हा पाणीसाठा पुरवावा लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमध्ये सध्या एकूण 5 लाख 66 हजार 599 दशलक्ष लिटर पाणी आहे. ही धरणे एकूण 14 लाख 47 हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याच्या क्षमतेची आहेत.