पारा चढल्याने अंगाची लाहीलाही; घामाच्या धारा

गेल्या काही दिवसांपासून मे महिन्यासारखे कडक ऊन मुंबईकरांना सतावत आहे. मुंबईत आज पारा 37 अंशावर गेल्याने अंगाची अक्षरशः लाहीलाही होत होती. तसेच अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. उन्हाळा आणखी कडक होत जाणार असून मार्च महिना प्रचंड तापदायक ठरेल, असे हवामान विभागानेच म्हटले आहे. त्यामुळे काळजी घ्या, भरपूर पाणी प्या, बाहेर जाताना टोपी, महिलांनी डोक्याला, तोंडाभोवती ओढणी गुंडाळून बाहेर पडावे, लहान मुलांना शक्यतो बाहेर नेऊ नका, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.