बनावट सहीद्वारे सरकारी पैशावर डल्ला
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या खात्याचे बनावट चेकबुक द्वारे अधीक्षकांची खोटी सही करून 9 लाख 87 हजार रुपये काढल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी सात जणा विरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे धोबीतलाव येथील जीटी गोकुळदास तेजपाल रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम करतात. रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना राबवली जाते.
या योजनेत रुग्णांना मोफत उपचार दिले जातात. योजनेसाठी पात्र होण्यासाठी रुग्णाकडून कागदपत्रे घेतली जातात. त्यानंतर ती मंजुरीसाठी सरकारकडे पाठवली जातात. योजनेत पात्र झाल्यावर मोफत उपचार केले जातात. या कामासाठी एका सरकारी बँकेत खाते उघडण्यात आले होते.
महिलेवर अत्याचार करणाऱया नराधमाचा जामीन अर्ज फेटाळला
रिअल इस्टेट पंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या 41 वर्षीय महिलेवर अत्याचार करणाऱया 34 वर्षीय तरुणाचा जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळला. आरोपी हा पीडित महिला काम करीत असलेल्या पंपनीत ‘सेल्स मॅनेजर’ होता. पीडित महिलेशी प्रेमसंबंध होते. याच प्रेमसंबंधातून तिने शरीरसंबंध ठेवण्यास संमती दिली होती, असा दावा आरोपी अमोल बोर्डेने केला होता. त्यावर पीडित महिलेतर्फे अॅड. प्राची पार्टे व अॅड. रचता धुरू यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यांच्या युक्तिवादाची गंभीर दखल न्यायालयाने घेतली. प्रथमदर्शनी पुराव्यांवरून आरोपीने जबरदस्ती करून शरीरसंबंध ठेवल्याचे उघड होते, असे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायाधीश नंदकिशोर मोरे यांनी नोंदवले आणि बोर्डेला जामीन मंजूर करण्यास नकार दिला.
वाहन अपघातात तिघांचा मृत्यू
सुसाट वेगातील स्कॉर्पिओच्या चालकाने ब्रेक मारल्याने अपघात झाल्याची घटना आज दुपारी चेंबूरच्या गव्हाणपाडा परिसरात घडली. या अपघातात हरिजन दास प्रमोद प्रसाद, हुसेन शेखचा मृत्यू झाला आहे. तर जखमी जावेद खान, मनोज करंटम आणि संजय सिंग वर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम आरसीएफ पोलिस करत होते. हरिजन, प्रमोद, हुसेन, जावेद, मनोज , संजय हे चेंबूरच्या लक्ष्मीनगर येथील रहिवासी. हरिजन, जावेद, प्रमोद हे वाहन चालकाचे काम करतात. आज हुसेनचे गव्हाणपाडा येथे काम होते. काम असल्याने ते सर्व जण आज सकाळी साडे अकराच्या सुमारास जावेद च्या स्क्रोपीओ गाडीतून गेले होते.