Mumbai Crime – भांडुपमधील ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये पाण्यात आढळला महिलेचा मृतदेह

मुंबईतील भांडुपमधून एक धक्कादायक घटना सकाळी 10 च्या सुमारास उघड झाली आहे. भांडुपमध्ये असलेल्या ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली असून महिलेचा मृतदेह मुलुंड येथील जनरल हॉल्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडुप पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह सकाळी 9.40 च्या सुमारास आढळून आला आहे. सदर महिलेचे वय अंदाजे 30 ते 35 वर्ष असण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह मुलुंड येथील जनरल हॉस्पिटलमध्ये भांडुप वन मोबाईच्या मदतीने पाठवण्यात आला आहे. महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.