अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात (Saif Ali Khan case Update) नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) म्हणण्यानुसार, सैफच्या घरातून सापडलेल्या 19 बोटांच्या ठशांचा अहवाल निगेटिव्ह आला असून सर्व बोटांच्या ठशांचे नमुने आरोपी शरीफुल इस्लामच्या नमुन्याशी जुळत नाहीत.
गुन्हेगारी अन्वेषण विभागने (CID) या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी शरीफुल इस्लामच्या बोटांच्या ठशांशी सैफ अली खानच्या घरातून सापडलेल्या बोटांच्या ठशांचे नमुने जुळवले आणि याबाबत मुंबई पोलिसांना माहिती दिली. सीआयडीने मुंबई पोलिसांना बोटांच्या ठशांच्या नमुन्यांचा निगेटिव्ह रिपोर्ट दिला आहे, म्हणजेच गुन्ह्याच्या ठिकाणाहून घेतलेले नमुने आरोपींच्या बोटांच्या ठशांशी जुळत नाहीत. आरोपी शरीफुलचे सर्व 10 बोटांचे ठसे सीआयडीच्या फिंगरप्रिंट ब्युरोकडे पाठवण्यात आले होते. यानंतर आता याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
सैफ अली खानवरील हल्ल्यात संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या तरुणाचे हाल, नोकरी गेली; लग्नही मोडलं