
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपवर ही धमकी देण्यात आल्याचं समजतंय. याप्रकरणी तेजस्वी घोसाळकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, वर्षभरापूर्वी अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्ह करत हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार लालचंद पाल यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गरीब नवाज नियाज कमिटी या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एकाने लालचंद यांना ठार मारण्याबाबतचा संदेश पोस्ट केला होता. याप्रकरणी लालचंद पाल यांनी एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल रोजी गरीब नवाज नियाज कमिटी या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एका मोबाईलधारकाने लालचंद यांना उद्देशून एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली. ‘जैसा अभिषेक को मारा वैसा लालचंद को भी मारेंगे’ असा इंग्रजीमध्ये संदेश पोस्ट करण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.